मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मैसूर कॉलनी आणि भारत पेट्रोलियम दरम्यान मोनो रेल्वे अडकली आहे. तासाभराहून अधिक काळ प्रवासी मोनोत अडकले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनोच्या पीआरओकडून प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तर दिली जात नसल्याची तक्रार नेहमी होत असते. आतादेखील पीआरओकडून प्रवाशांना कोणतेही उत्तर दिले जात नाही आहे. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही माहिती मिळत नाही. मोनोत आत अडकलेले आणि स्टेशनवरील सर्व प्रवासी या प्रकारामुळे संभ्रमात आहेत.