मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे
पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. (Rain In Mumbai) मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे आहेत.
मुंबई : पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. (Rain In Mumbai) मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे आहेत. (Rain In Mumbai and Monsoon Alert) मध्यम ते अतीतीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत सकाळपासून संततधार सुरु झाल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर मुंबईसह कोकण, विदर्भात पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 200 मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Monsoon Alert : Next 3 hours important for Mumbai, Thane, Raigad)
गरज असेल तरच घराबाहेर पडा !
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्यास पहाटेपासून सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पुढील तीन तास महत्त्वाचे असून पुढील 3 तासांत मध्यम ते संततधार पावसाची शक्यता आहे. कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा सकाळीच पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत दादर सायन परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. आज दिवसभर असाच पाऊस राहिल्यास आजही मुंबईची तुंबई होते का हे बघावं लागेल. परवा पडलेल्या पावसानंतर आलेल्या अनुभवातून मुंबईकरांनी आपली काळजी घ्यायची आहे. कारण पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
कोकणासह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
पुढील पाच दिवस कोकणासह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अत्यंत मुसळधार म्हणजेच 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वाराही वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, तर घाट क्षेत्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे.
मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. रायगडमध्ये 12 जूनला अत्यंत मुसळधार म्हणजेच 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. मान्सून आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. गेल्या वर्षी 14 जूनला त्याने महाराष्ट्र व्यापला होता. कोकणातून तो मुंबई परिसरात दाखल होत असताना किनारपट्टीच्या भागात मोठ्या उंचीचे ढग निर्माण झाले होते. त्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे.