Mumbai Couple Video : मुंबई आणि पाऊस (Rain Viral Video) जणू काही हे समिकरण आहे. पहिला पाऊस असो किंवा विकेंडला पावसाची मजा घेण्यासाठी मुंबईकर (Mumbai Video)  घराबाहेर पडतात. नुकताच इंदोरमधील एका कपलचा पहिला पावसातील रोमँटिक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. पावसात प्रेम अधिक बहरतं असं म्हणतात. पावसातील प्रेमाचा हा व्हिडीओ हृदयाला स्पर्श करतो. (bollywood rainy song)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी बॉलिवूडमध्येही पावसावर असंख्य गाणी आहेत. त्यातील मुंबई आणि पाऊस यांचं नातं (rainy day in mumbai)दाखवणारं अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांचं 'रिमझिम गिरे सावन'  (Bollywood songs) आजही मुंबईकरांना पाऊस पडायला लागलं की आठवतं. असंही काही मुंबईकर आहेत त्यांना पावसाचा कंटाळा येतो, पावसामुळे लोकलचं कोलमडलेले वेळापत्रक, रस्त्यावरील खड्डे आणि सखल भागात साचणारं पाणी... (Romantic In Rain Viral Video)


पण या आजी आजोबांनी  (monsoon couple video) मुंबईतील पावसाचा खऱ्या आनंद लुटला आहे. या वृद्ध जोडप्याने अमिताभ आणि मौसमी यांच्या याच गाण्यावर 'रिमझिम गिरे सावन' संपूर्ण गाण्यातील आयकॉनिक सीकेन्स पुन्हा एकदा रंगवले आहेत. या गाण्यातील अमिताभ, मौसमी यांचं हुबेहुब चित्रिकरण या जोडप्याने केलं आहे. अगदी मुंबईतील त्या प्रत्येक लोकेशनवर जाऊन त्यांनी पाऊस, निखळ प्रेम अनुभवला आहे. हा व्हिडीओमधील 60 वर्षीय या जोडप्याचा उत्साह पाहून थक्कं झाली आहेत. (monsoon couple bollywood song Amitabh Bachchan rimjhim gire sawan scene by scene on rainy day in mumbai Viral Video on Internet Trending Video on google Watch now)


गेटवे ऑफ इंडिया ते मरीन ड्राईव्ह या कपलने पावसाचा आनंद मनमुराद लुटला आहे. पावसात भिजत या जोडप्यातील प्रेम आणि उत्साह पाहून जगावं तर असं हेच वाटतं. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. 



हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये आहे. अगदी महिंद३ समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनाही हा व्हिडीओ शेअर करण्याचा मोह आवरला नाही. ''आयुष्य कसं सुंदर बनवावं हे या जोडप्याकडून शिकावं''



क्लासिक सिनेमाच्या युगात सोशल मीडियाचा ट्रेंडमध्ये या जोडप्याची ही कल्पनाशक्ती आणि उत्साह सध्या चर्चेचा विषय बनली आहे. 



अमिताभ आणि मौसमी यांचा हा चित्रपट  1979 मधील आहे. त्यातील या गाण्यावर या जोडप्याने हुबेहुब चित्रिकरण केल्यावर मुंबई आजही तशीच आहे, असं जाणवतं.


एका यूजर्सने म्हटलं आहे की, ''दक्षिण बॉम्बेत 50 वर्षात फारसा बदल झालेला नाही. रस्त्यावरील गाड्या सोडल्या तर...''



हेसुद्धा वाचा - पहिला पाऊस आणि ते दोघं...भररस्त्यात कपलचा रोमान्स करतानाचा Video Viral


खरंच आज हा व्हिडीओ पाहून कलाकारही अवाक् होतील. आरडी बर्मन आणि किशोर कुमार आज असते तर त्यांनाही या गाण्याची जादूची किमया कळली असती. या धावपळीच्या जगात हा असा आनंद पाहून मनं कसं प्रसन्न होतं.