मुंबई: मान्सून आता अवघ्या काही तासांमध्येच गोवा आणि महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. दरम्यान, मान्सून पूर्व पावसाने राज्यात हजेरी लावली आहेच. मात्र, भारतातील अनेक राज्यांमध्ये अद्यापही उष्णतेचा कडाका कायम आहे. अशा स्थितीत भारतातील सुमारे १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण भारतात पावसाचे आगमन झाले असून, अनेक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. दर, पूर्व भारतातही पाऊस अडचणी वाढवू शकतो.


या राज्यांत पावसाचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने इशारा दिला आहे की, मध्यप्रदेश, पंश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र (विदर्भ, कोकण), गोवा, तामिळनाडू, तेलंगना, अर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी आदी राज्यांना इशारा दिला आहे.


या ठिकाणी पाऊस मुसळधार


अंदमान-निकोबार, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मोझोराम, त्रिपूरा, तेलंगना, रायलसीमा, आंध्र प्रदेश, केरळ


दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपूरा, मणिपूरसह १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. झारखंडमध्ये डुमका जिल्ह्यात वीज कोसळून २ महिला आणि २ पुरूष अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी आहे. कर्नाटकमध्येही पाऊस संततधार बरसत आहे. गेल्या २४ तासात ५ जणांचा बळी गेल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये काही ठिकाणी ७ सें.मी. पावसाची नोंद झाली असून, शेतीमालाचेही मोठे नुकसान झाले आहे.