मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. शेतकरी कर्जमाफी समृद्धी महामार्ग, मुंबईतील एसआरे घोटाळा,0राज्यातील कायदा सुव्यवस्था, अशा मुद्यांवर विरोधक या अधिवेशनात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणरा आहेत.


मात्र अधिवेशनापूर्वीच कॉंग्रेस आणि  राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्याने हे अधिवेशन सरकारला काहीसे सोपे जाईल असं बोललं जातं आहे. मागील अधिवेशनात दोन्ही कॉंग्रेसने समन्वय ठेउन कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला चांगलंच अडचणीत आणले होते. या अधिवेशनात दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार विरोधात भूमिका घेतली नाही तर सरकारसाठी दिलासादायक बाब असणार आहे.