मुंबई :  राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हवामान विभागाने राज्यातील 16 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट दिला आहे. कोकणात पुढील 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. अहमदनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस असेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. (monsoon update 2022 next 5 days maharashtra heavy rain alert to state this 16 districts give yellow alert)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसऱ्या बाजूला लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारदरा, बुलढाणा, चंद्रपूर आणि विदर्भातही 13 आणि 14 जूनला वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


अलिबागेत दमदार पाऊस


अलिबाग शहर आणि परीसरात पावसाने दमदार हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. अनेक दिवसापासून उकाडयाने हैराण झालेल्या नागरीकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतीच्या कामाला वेग येणार आहे. पावसामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.