Cyclone Biporjoy High Tide : गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रावर घोंगावणाऱ्या चक्रिवादळसदृश्य वाऱ्यांनी अखेर रौद्र रुप धारण केलं आणि हवामान विभागानं या वादळाचा बिपरजॉय असं नाव दिलं. दर दिवसागणिक या वादळानं रौद्र रुप धारण केलं असून, आता चे मुंबई- महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे सरकताना दिसत आहे. असं असलं तरीही राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे स्पष्ट परिणाम दिसत असून, समुद्रही खवळल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला अरबी समुद्राला उधाण आल्यामुळं मुंबई किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं 13 जूनपर्यंत मालवण ते वसई किनारपट्टी भागात तब्बल 3.5 ते 5.1 मीटर उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. इशाऱ्याच्या धर्तीवर सध्याच्या घडीला नागरिकांना किनाऱ्यांच्या नजीक न जाण्याचा इशारा देण्यात आला आले. तर, एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचं सांगण्यात येत आहे.


मान्सूनमध्ये तब्बल 52 वेळा समुद्र खवळणार? 


यंदाच्या वर्षी मान्सूनच्या दिवसांमध्ये समुद्र एकदोन नव्हे, तर तब्बल 52 दिवसांना खवळणार आहे. दरम्यानच्या काळात मुंबईह राज्याच्या विविध किनारपट्टी भागांमध्ये मुसळधार पावसासोबतच दर्याचं रौद्र रुप धडकी भरवणार आहे. ज्यामुळं मुंबईतील सखल भागांमध्ये पुन्हा एकदा पुणी साचल्याचं चित्र पाहायला मिळाल्यास नवल वाटू नये. 


हेसुद्धा वाचा : Cyclone Biporjoy मुळं महाराष्ट्रात यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा 


 


मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त G. G. Godepure यांनी काही दिवसांपूर्वीच यासंबंधीची माहिती देत नागरिकांना सतर्क केलं. चार मीटरहून जास्त उंचीच्या लाटा ज्या दिवशी उसळणार आहेत त्या दिवसांना emergency management plan मध्ये समाविष्ट करून घेण्यात आल्याचं सांगत जून ते सप्टेंबरदरम्यान ही परिस्थिती उदभवू शकते असंही ते म्हणाले. 


कोणत्या महिन्यात कोणत्या दिवशी येणार हाय टाईड? 


जून महिन्यातील 13 दिवस, जुलै महिन्यातील 14 दिवस, ऑगस्टचे 14 दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील 11 दिवसांना समुद्र रौद्र रुप धारण करेल. ज्यामुळं नागरिकांनी आणि मच्छिमारांनी सतर्क रहावं. Maharashtra Maritime Board कडून यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रकच जाहीर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शहराच्या समुद्र किनाऱ्यावर साधारण 4.60 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळतील असा इशारा देण्यात आला आहे. 


  • जून महिन्यात समुद्रात 4 ते 8 जून दरम्यान हायटाईडचा इशारा देण्यात आला होता. ज्यानंतर आता 13 जूनलाही मोठ्या लाटा उसळणार असल्याचं सांगण्यता आलं आहे. 

  • पुढे 3 ते 8 जुलै या तारखांदरम्यान समुद्र खवळलेला असेल. शिवाय यादरम्यान पावसाचा जोरही वाढलेला असेल. 

  • ऑगस्ट महिन्यात 1 ते 6 ऑगस्ट आणि 30-31 ऑगस्ट या अखेरच्या दोन दिवशी समुद्राचं रौद्र रुप पाहायला मिळू शकतं. 

  • सप्टेंबर महिन्यातही असेच काही दिवस समुद्र खवळलेला असेल. 3, 28, 29, 30 या तारखांना किनारपट्टी भागांना उंच लाटांचा तडाखा बसेल.