मुंबई : एमएसआरडीसीचे एमडी आणि समृद्धी महामार्गाची जबाबदारी सांभाळत असलेल्या राधेश्याम मोपलवारांनी कथिटत ऑडिओ क्लीपमधील सर्व आरोप फेटाळले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळं चौकशीतून काय ते सत्य बाहेर येईलच असं मोपलवारांनी झी २४ तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलं आहे.


गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि एमएसआरडीसीचे एमडी राध्येश्याम मोपलवार यांना आजच्या आज निलंबित करण्याची मागणी विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्णविखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. सध्या समृद्धी महामार्गाची जबाबदारी असलेले अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांचं दलालाबरोबरचं वादग्रस्त फोन संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय. या कथित संभाषणात मोलपलवार आणि बिल्डरचं साटंलोटं उघड झाल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीची योजना भ्रष्ट अधिका-याच्या हातात गेलीय का? असा सवाल उपस्थित होतो आहे.


>