मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढतेच आहे. आज दिवसभरात राज्यात 11 हजार 813 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज एका दिवसात 413 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 9 हजार 115 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 5 लाख 60 हजार 126 इतकी झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 3 लाख 90 हजार 958 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट 69.8 टक्के एवढा झाला आहे. 



सध्या राज्यात 1 लाख 49 हजार 798 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यातील कोरोना मृतांचा आकडा 19 हजार 63 इतका आला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.4 टक्के आहे. 


आतापर्यंत राज्यात 29 लाख 76 हजार 90 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 लाख 60 हजार 126 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात 10 लाख 25 हजार 660 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 36 हजार 450 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.