मुंबई : शहरातील तब्बल 762 पेक्षा अधिक खासगी रुग्णालये (Mumbai hospitals) आणि नर्सिग होममध्ये अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे आढळून आले आहे. भंडाऱ्यातील शिशू केअरमधल्या आगीनंतर मुंबई अग्निशमन दलाकडून खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होमची पाहणी करण्यात आली. यात ही माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्निरोधक यंत्रणा नसलेल्या 219 खासगी नर्सिग होम आणि रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. 120 अटींची पूर्तता करावी अशी नोटीस बजावण्यात आली आहे. भांडुपच्या ड्रीम्स मॉल भीषण आग लागली. ही आग दुसऱ्या दिवशी विझविण्यात आली आहे. दरम्यान, मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेले सनराईज रुग्णालय आगीच्या विळख्यात सापडले. रुग्णालयातील 11 रुग्णांचा गुदमरुन आणि होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीप्रकरणी 8 जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. या दुर्घटनेनंतर रुग्णालयांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 


भांडुपच्या रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेनंतर मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त प्रभात रहांगदले यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत. पुढील 15 दिवसांत आगीबाबत आणि आगीच्या कारणांबाबत चौकशी करुन अहवाल सादर करा असं या आदेशात नमूद करण्यात आले आहे.