26/11 चा हल्ला : मोशे पुन्हा मुंबईत आलाय !
मोशे, या नावाशी मुंबईचं एक वेगळं नातं आहे. 26/11 च्या हल्ल्यातून वाचलेलं त्यावेळी अवघ्या दोन वर्षांचं ते बाळ आजही मुंबईकरांच्या डोळ्यांसमोरुन हलत नाही. पण आता हे बाळ मोठं झालंय.
मुंबई : मोशे, या नावाशी मुंबईचं एक वेगळं नातं आहे. 26/11 च्या हल्ल्यातून वाचलेलं त्यावेळी अवघ्या दोन वर्षांचं ते बाळ आजही मुंबईकरांच्या डोळ्यांसमोरुन हलत नाही. पण आता हे बाळ मोठं झालंय.
नऊ वर्षांचा झालेला मोशे पुन्हा मुंबईत आलाय. 26/11 ला नरीमन हाऊसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मोशेच्या आई वडिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी दोन वर्षांच्या मोशेला भारतीय नौदलानं वाचवलं होतं. त्यानंतर मोशे इस्रायलला गेला.
आता नरीमन हाऊसचं रुपांतर स्मारकामध्ये करण्यात आलंय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या सहा दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. त्यांच्या हस्ते गुरुवारी नरीमन हाऊस स्मारकाचं उदघाटन होणार आहे. त्यासाठी मोशेही मुंबईत आलाय.