मुंबई : आतापर्यंतच्या ताज्या घडामोडी... देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे... ओमायक्रॉन चाचणी अहवाल दोन तासांत मिळणार आहे...   एसटी कर्मचा-यांना आजचा अल्टीमेट देण्यात आला आहे..... सविस्तर बातम्या खालील प्रमाणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

-  देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारताची हरनझ कौर संधूच्या डोक्यावर  Miss Universe 2021चा मुकूट ठेवण्यात आला. भारताने तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे.


1. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा शोध लावणा-या डी ओलिवेरा यांना धमक्या येतायत.ओलिवेरा यांच्या सुरक्षेत वाढ केलीय. ख्रिसमस नववर्षाच्या काळातच ओमायक्रॉनचं संकट आलं. पर्यटन व्यवसायिकांचं नुकसान होतंय. त्याच पार्श्वभूमीवर धमकी दिल्याची शक्यता आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना कोरोना झालाय. 


2. देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 38 वर पोहोचलीय. यासंदर्भात केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केलीय. यासंदर्भात विषय समितीची विशेष बैठक होणारेय. या बैठकीत बुस्टर डोससंदर्भात चर्चा होणारेय.


3. ओमायक्रॉन चाचणी अहवाल दोन तासांत मिळणार आहे. आयसीएमआरने 2 तासांत निकाल देणा-या किटची निर्मिती केलीय. हे चाचणी कीट लवकरच बाजारात मिळेल. या किटची आरटीपीसीआर रचना ही हायड्रोलिसिस पद्धतीवर आधारित आहे. सध्या ओमायक्रॉनचा निकाल यायला 3 ते 4 दिवस लागतात.


4. एसटी कर्मचा-यांना आजचा अल्टीमेट देण्यात आला आहे. आज कामावर हजर न झाल्यास कठोर कारवाई एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नोटिशीला उत्तर घेणार, त्यावर सुनावणी होणार आहे. 


5.  नाशिक जिल्ह्यात आजपासून शाळा सुरू होत आहेत. पहिली ते सातवीचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत. मुलांच्या स्वागतासाठी शाळा शाळांमध्ये तयारी केली जात आहे. थंडीमुळे आज 8 वाजल्यापासून शाळा सुरू होणार आहे.


6. मुंबईत रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचा महापालिकेचा विचार आहे. सध्या मुंबईत 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण केलं जातं. ही वेळ रात्री 10 वाजेपर्यंत करण्याचा विचार आहे. दुसरा डोस टाळणा-यांचं लसीकरण पूर्ण करण्यावर भर आहे.


7.  मुंबईत गेल्या 24 तासांत 187 नव्या रुग्णांची नोंद झालीय...तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला...मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवलेली असली तरी दैनंदिन रुग्णांची संख्या कमी होतेय...उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमीकमी होऊ लागलीय...तर एका दिवसात 219 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत...यामुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळालाय...


8. मुंबईत कलिनामधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. ओमयक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असताना ही गर्दी धडकी भरवणारी होती. कॅनेडीअन रॅपर एबी धिलॉनची ही लाईव्ह कॉन्सर्ट होती. यावेळी अनेक तरुणांच्या तोंडाला मास्क दिसून आला नाही.  विशेष म्हणजे याच कॉन्सर्टला सारा अली खान, जान्हवी कपूरही उपस्थित होत्या.