गाडीतून फेकल्याने 10 महिन्याच्या मुलीचा मृत्यू; आईसोबतही विनयभंगाचा प्रयत्न
Crime News : मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच महिलेला अश्रू अनावर झाले. महिलेवर सध्या वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत
Crime News : मुंबई अहमदाबाद महामार्गावर (mumbai ahmedabad highway) कॅबमध्ये ( cab driver) एका महिलेसोबत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये महिलेल्या 10 महिन्याच्या मुलीचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कॅबमधील प्रवाशाला विरोध केल्याने त्यांनी महिलेच्या मुलीला चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिले होते. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
विरोध केला म्हणून महिलेला फेकून दिले
शनिवारी सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार फाट्याजवळ एका दहा महिन्याच्या मुलीला कॅबमधून फेकून दिले होते ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या मुलीचा आईसोबत कॅबमध्ये विनयभंग करण्यात आला. विरोध केला म्हणून महिलेलाही गाडीच्या बाहेर फेकून देण्यात आले. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे.
मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच महिलेला अश्रू अनावर
ही महिला तिच्या मुलीसह पेल्हार येथून वाडा तालुक्याच्या पोशेरे येथून शेअर कॅबमध्ये प्रवास करत होती. यावेळी तिच्यासोबत अन्य प्रवासीसुद्धा होती. या प्रवाशींनी तिच्यासोबत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. जखमी महिलेवर वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच महिलेला अश्रू अनावर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीची ओखळ पटली
"मुंबई - अहमदाबाद महामार्गावर चालत्या गाडीमध्ये महिलेसोबत विनयभंग केल्याप्रकरणी विजय कुशवाहा नावाच्या एका व्यक्तीविरोधात पालघर जिल्ह्यातील मांडवी येथे भादवि कलम 304 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे तर महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत," अशी माहिती पोलिसांनी दिली.