Mumbai Local Train Accident : विरार लोकल ट्रेनला क्रेनचा फटका; मोटारमनच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत
अचानक समोर क्रेन आली आणि मोटरमन गोंधळला. काही कळण्याआधीच या क्रेनने लोकलला फटका दिला. मोटरमनच्या केबीनची काच फुटून मोटरमन जखमी झाला.
प्रथमेश तावडे, झी मीडिया, नायगाव : पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील नायगाव रेल्वे स्थानकाजवळ (Naigaon railway station) एक विचित्र दुर्घटना घाडली आहे. विरार लोकल ट्रेनला (Virar Local Train) क्रेनच्या हुकचा फटका बसला. यात विरार लोकलचा मोटरमन गंभीर जखमी झाला आहे. यात मोटारमनच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत (Motorman injured) झाली आहे.
नायगाव रेल्वे स्थानकात रेल्वेच्या कामासाठी क्रेन उभी करण्यात आली आहे. या क्रेनच्या हुकचा फटका येथून जाणाऱ्या विरार लोकल ट्रेनच्या काचेला बसला. मोटरनमच्या केबीजवळ या क्रेनच्या हुकाचा फटका बसला. यामुळे या अपघातात मोटरमनच्या डोक्याला दुखापत झाली तो असून गंभीर जखमी झाला आहे.
नायगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर चर्चगेट विरार ही ट्रेन काल रात्री 12 वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्मवर येताच रेल्वेच्या कामासाठी उभ्या असलेल्या एका ट्रेलरचा हुक ट्रेनच्या मोटरमॅन च्या डब्ब्याला समोरून लागला. यामुळे मोटरमनच्या केबीनची काच फुटली.
या अपघातात काचेचा तुकडा मोटरमॅन एम डी आरिफ यांच्या डोळ्याला आणि डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यामुळे ट्रेन नायगाव रेल्वे स्थानकातच थांबवण्यात आली. डोळ्यातून रक्तसत्राव होऊ लागला. जखमी मोटरमनना तात्काळ उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आले. त्यानंतर या ट्रेन मधील प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून येणाऱ्या लोकलने विरार रेल्वे स्थानकात सोडण्यात आले.
यामुळे काहीकाळ रेल्वे स्थानकात गोंधळ उडाला होता. दुसऱ्या मोटारमनने ही ट्रेन विरार रेल्वे स्थानकात पोहोचवली. रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशी आदेश दिले आहेत. समोर लोकल ट्रेन येताना दिसत असताना ही क्रेन काम करत होती का? मोटरमनला कोणत्या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या की नव्हत्या? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.