मुंबई : शिवसेना (Shiv Sena)खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) सध्या ईडीच्या (ED)रडावर आहेत. ईडीने भावना गवळी यांना समन्स पाठवलं आहे. खासदार भावना गवळी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. पण अर्धा तास त्या 'वर्षा' बंगल्यावर वाट बघत होत्या. पण अर्धा तास वट बघूनही मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने त्या 'वर्षा'वरुन परतल्या. 


भावना गवळी ईडीच्या रडारवर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावना गवळी महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीत परावर्तीत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सईद खान या कंपनी डायरेक्टरला अटक करण्यात आली आहे. या कंपनीमध्ये गवळी या निर्देशक होत्या. त्यामुळे भावना गवळी यांचीही ईडीकडून ही चौकशी होणार आहे, असं सांगितलं जात आहे. 


शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप


राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाजपकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. भाजपचे किरीट सोमय्या यांनी काही नेत्यांवर आरोप केले आहेत. त्यानंतर ईडीची चौकशी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता शिवसेना मंत्री आणि नेत्यांना  ईडी चौकशीचा सामना करावा लागत आहे. 


सध्या शिवसेनेचे तीन मंत्री ईडीच्या (ED) रडारवर आहेत. 100 कोटी वसुलीप्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यावर सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत अफरातफरीचे आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यानंतर यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनाही ईडीने समन्स पाठविले आहेत.