मुंबई : Sambhaji Raje Atigetion : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या ( Maratha reservation) काही मागण्यासाठी खासदार संभाजीराजे आमरण उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, त्यांनी डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे. दरम्यानस आज त्यांना उपोषणस्थळी आझाद मैदानावर पाठिंबा देण्यास आलेल्या वारकऱ्यांसमोर संभाजीराजे अत्यंत भावूक झालेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटलेत. (MP Sambhaji Raje had tears in his eyes in front of Warkari)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीराजे यांना काही वारकरी पाठिंबा द्यायला आले आहेत. यावेळी अनेक अभंग वारकरी संप्रदायाने सादर केले. त्यांचं कौतुक करताना संभाजीराजे भावूक झालेत. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळालेत. मराठा आरक्षणाप्रकरणी उपोषण करणाऱ्या संभाजीराजेंची त्यांच्या पत्नी संयोगिता राजे यांनी विचारपूस केली. सं




भाजीराजेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांना अशक्त वाटत आहे. त्यांची शुगर लेव्हलही खाली गेली आहे. मराठा आरक्षणप्रकरणी मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांचे शिष्टमंडळ यांच्या चर्चेतून तोडगा निघेल, असा विश्वास संयोगिता राजे यांनी व्यक्त केला आहे. तर संभाजीराजेंना कुणीही मानसिक त्रास देऊ नका, अशी विनंती त्यांनी केली आहे.