मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public service commission) परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आयोगाच्या नियमांनुसार, एमपीएससीची मोजून ठराविक वेळाच परीक्षा देता येते. त्यानंतर संबंधित उमेदवाराला परीक्षा देता येत नाही. या जाचक अटीमुळे अनेक उमेदवारांचं अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण राहतं. याचीच दखल घेत आयोगाने उमेदवारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. (mpsc maharashtra public service commission decision to limit number of attempts of candidates appearing competitive examinations canceled) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमपीएससीने उमेदवारांच्या कमाल संधीबाबत फेरबदल केले आहेत. उमेदवारांच्या कमाल संधीची मर्यादा रद्द करण्यात आलीय. आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देता येणार आहे. मर्यादा रद्द झाल्याने आता वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येईल. यासंदर्भात एमपीएससीनं नोटीफीकेशनही काढलं असून ते ट्विटरवर शेअर केलं आहे.


यामुळे आता उमेदवारांना आधीप्रमाणे जातीनिहाय ठरवण्यात आलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.