एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन
पुणे : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरु आहे, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय सरकारने घेतला आहे, तो मागे घ्यावा आणि येत्या १४ मार्च रोजीच परीक्षा घ्यावी, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
एमपीएससीची परीक्षा ठरल्या दिवशी घेतली गेली पाहिजे. एमपीएससी परीक्षेची तारीख सलग चार वेळेस पुढे ढकलल्यानंतर आज पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे. पुण्यात पहिल्यांदाच एमपीएससीचे विद्यार्थी एवढे आक्रमक झालेले दिसून येत आहेत.
पुण्यात शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत.