मुंबई : सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या बचत गटांना कर सवलत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली आहे. मासिक पाळी स्वच्छता दिनाचं औचित्य साधत वर्सोव्यात सॅनिटरी पॅड बँकचे उदघाटन करण्यात आलं. आमदार भारती लव्हेकर यांच्या संकल्पनेतून ही बँक साकारली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ऑनलाईन सॅनिटरी पॅड बँकच्या माध्यमातून इच्छुक व्यक्ती काही रक्कम दानही करु शकते. या रकमेतून टी फाऊंडेशनच्या माध्यमातून बनवल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड आदिवासी पाड्यातील शाळा, पालिका शाळा आणि आर्थिक दृष्टया दूर्बल घटकातील महिलांना वितरीत केले जातील. 


सॅनिटरी पॅडवरील कर हटवला गेल्यास कमीत कमी किंमतीत महिलांना हे सॅनिटरी पॅड उपलब्ध होतील आणि सर्वाईकल कॅन्सरपासून महिला सुरक्षित राहतील, असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी अभिनेत्री झीनत अमान, निशीगंधा वाड याही उपस्थित होत्या.