मुंबई : एसटी महामंडळातील अतांत्रिक पर्यवेक्षकीय पदाची परीक्षा 28 आणि 29 ऑक्टोबरला आहे. जानेवारी 2017 मध्ये एसटी महामंडळामार्फत देण्यात आलेल्या विविध रिक्त पदाच्या जाहिरातीमधील 313 अतांत्रिक पर्यवेक्षक पदासाठी 28 आणि 29 ऑक्टोबरला परीक्षा आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

38 हजार 418 परीक्षार्थींची ऑनलाईन परीक्षा तीन सत्रात म्हणजे सकाळी 9 ते 10.30, दुपारी 12.30 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते 5.30 दरम्यान घेण्यात येणार आहे. 


संबंधित उमेदवारांनी www. msrtcexam. in या संकेतस्थळावरून माहिती तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र घ्यावे असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आलंय.