मुंबई : एसटीचा संप आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. या संपाचा मोठा आर्थिक  फटका बसलायाय. संपाच्या दोन दिवसांत एसटीचे ४५ ते ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता आजपासून एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसे संकेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी महामंडळाचं मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रलच्या आगारातून आज तिसऱ्या दिवशी एकही एसटी सुटलेली नाही. प्रवासी तुरळक संख्येने एसटी स्थानकावर आहेत. त्यांचे हाल होत आहेत. दरम्यान,  बुधवारी रात्री उशिरा एक वाजेपर्यंत  बैठक झाली. पण यामध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही. एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी सकाळी दहापासून रात्री एकपर्यंत चर्चेच्या १३  फेऱ्या झाल्या. 


तरच आता पुढची बोलणी


एसटी कर्मचाऱ्यांनी संप मिटवला तरच आता पुढची बोलणी होतील, असं सरकारनं स्पष्ट केलंय. ४ हजार ते ७ हजारांपर्यंत पगारवाढ द्यायला प्रशासन तयार होतं, मात्र संघटनांना ही ऑफर अमान्य होती. जास्तीत जास्त वाढ देण्याचा प्रयत्न आम्ही केला, त्यासाठी २.५७ हजार कोटींचा प्रस्ताव ठेवला होता. यापुढे सरकारकडून एक रुपयाही वाढवून मिळणार नाही, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते  यांनी स्पष्ट केले. मात्र, सेवा ज्येष्ठता आणि सातव्या वेतन आयोगावर एसटी कर्मचारी ठाम असल्याने संपावर तोडगा निघत नाही.


पुण्यात संपात फूट


पुण्याजवळच्या भोर एसटी डेपोमधून ८ एसटी बसेस मार्गस्थ झाल्यायत.  पोलीस बंदोबस्तात या एसटी रवाना झाल्या. एसटीमधल्या कामगार सेनेचे कर्मचारी कामावर रुजू झालेत. कामगार सेना ही संपात सहभागी झाली नव्हतीच. पण गेले दोन दिवस संपक-यांचा दबाव असल्यानं एसटी बंद ठेवण्यात आल्या होत्या. आज संपक-यांचा दबाव झुगारुन अखेर आठ एसटी बसेस सकाळी मार्गस्थ झाल्यायत.