मुंबई : महाराष्ट्रात क्रूझ पर्यटनला चालना मिळावी यासाठी एमटीडीसी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने उपक्रम सुरू केलाय. त्या अंतर्गत युरोपातल्या क्रुझिंग कंपनीच्या कोस्टा निओ क्लासिका या क्रूझचं मुंबईत आगमन झालंय. मुंबई ते मालदीव व्हाया कोची असा प्रवास ही क्रूझ करणार आहे. चला आपणही करूया या शानदार क्रूझची सफर


सोयी सुविधांनी सज्ज क्रुझ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

654 केबिन्स, कॅसिनो, चित्रपट गृह, शॉपिंग सेंटर, सोना आणि स्टीम, बॉल रूम, ग्रँड बार, जिम, जॉगिंग ट्रॅक, पोहण्याचे दोन तलाव.  एखाद्या सेवन स्टार हॉटेललाही लाजवेल अशा विविध सुविधा... ही दृश्य आहेत कोस्टा क्रूझ मधली. सध्या ही क्रुझ मुंबई बंदरात दाखल झालीय. 


सेव्हन स्टार जहाज 


सगळ्या सोयी सुविधांनी सज्ज असं हे सेव्हन स्टार जहाज आहे. परदेशात आलिशान क्रूझ प्रवासाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. त्याच सुखसोयी आता भारतीय पर्यटकांनीही मिळणार आहेत. मुंबई ते मालदीव व्हाया कोची असा प्रवास ही क्रूझ करणार आहे. 


पर्यटकांसाठी आलीशान सुखसोई


दर पंधरा दिवसांनी या क्रूझच्या फेऱ्या होणार आहेत. या आलीशान सुखसोई मिळवण्यासाठी पर्यटकांना खिसाही मोकळा करावा लागणार आहे.  4 दिवसांसाठी 30 हजार 7 दिवसासाठी 45 हजार एका व्यक्तीला मोजावे लागणार आहेत.


 लाखो पर्यटक परदेशात जातात


मुंबई आणि भारतातून लाखो पर्यटक दरवर्षी क्रूझचा आनंद घेण्यासाठी परदेशात जातात. आता परदेशात जाण्याऐवजी याच सर्व सुखसोयी त्यांना भारतातच मिळणार आहेत.  शिवाय यातून रोजगार निर्मितीही होणार आहे. यामुळेच येत्या डिसेंबरअखेरपर्यंत पर्यटकांसाठी सुसज्ज अशी मुंबई गोवा शिपही सुरू होणार आहे.


पर्यटनच्यादृष्टीने समुद्र किनारा उपेक्षितच 


महाराष्ट्रासह देशाला मोठा समुद्र किनारा आहे. मात्र आजपर्यंत तो पर्यटनच्यादृष्टीने उपेक्षितच राहीलाय. आता काळानुसार असे उपक्रम राबवल्यामुळे भारतात क्रूझ पर्यटन वाढणार आहे. त्याच बरोबर रोजगार निर्मिती आणि परकीय चलन ही वाढण्यास हातभार लागणार आहे.