मुंबई : Maratha reservation : मराठा आरक्षणावर बरंच काम झाले आहे. पण खासदार (संभाजीराजे) महोदयांना ते सांगण्यात आम्ही अपयशी पडलोय, अशी खंत व्यक्त करत मराठा आरक्षणावर प्रतिक्रीया काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आजपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षण कधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यासाठी वेळही लागू शकतो. पण आम्ही केलेल्या सात मागण्यांपैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. 15 दिवसात या मागण्या मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितले होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटले आहे.


मराठा समाजाला नव्याने आरक्षण?



दरम्यान, मराठा समाजाला नव्याने आरक्षण देण्याची चाचपणी राज्य सरकारने सुरू केली आहे. या समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षां निवासस्थानी झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लवकरच या स्वतंत्र आयोगासाठी अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणा केली जाणार आहे. निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे केवळ ओबीसी प्रकरणांची हाताळणी असेल, असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.