Muhurat Trading साठी तयार आहात ना? जाणून घ्या Timings अन् चर्चेतील शेअर्सबद्दल
Muhurat Trading Timings: आज दिवाळीनिमित्त शेअर बाजारामध्ये खास मुहूर्त ट्रेडींग पार पडणार आहे. मुहूर्त ट्रेडींगचे टायमिंग काय आहेत? या ट्रेडींगदरम्यान कोणत्या शेअर्सवर लक्ष ठेवायचं जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Muhurat Trading Timings: भारतीय शेअर बाजार आज सायंकाळी एका तासासाठी उघडणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजार मुहूर्त ट्रेडींगसाठी अवघा तासभरासाठी सुरु होणार आहे. हिंदू संवत् वर्षाचा आरंभ म्हणून दरवर्षी शेअर बाजारामध्ये मुर्हूत ट्रेडींगची परंपरा आहे. विक्रम संवत् ही कालगणना जॉर्जिअन म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरपेक्षा 57 वर्ष पुढे आहे. म्हणजेच यंदाच्या दिवाळीमध्ये 2081 संवत् सुरु होत आहे. त्याच निमित्ताने या नव्या संवत् सुरुवातीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
जगात असं कुठेही होत नाही
हिंदू परंपरेनुसार पवित्र काळाला मुहूर्त असं म्हणतात. यावरुन मुहूर्त ट्रेडींगला नाव पडलं आहे. भारतीय शेअर बाजाराच्या माध्यमातून खरेदी विक्री करणारे शेअर बाजारातील ट्रेडर्स हा संवत् मुहूर्त शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी फारच उत्तम कालावधी असतो असं मानतात. या कालावधीत गुंतवणूक केल्यास भरभराट होते अशी शेअर ट्रेडर्सची मान्यता आहे. विशेष म्हणजे जगभरातील कोणत्याही शेअर बाजारामध्ये अशाप्रकारचा ट्रेण्ड पाहायला मिळत नाही जिथे अवघ्या काही काळासाठी शेअर बाजार खुला केला जातो. त्यामुळे मुहूर्त ट्रेडींग हे भारतीय शेअर बाजाराचं वैशिष्ट्यं आहे.
आज कधी सुरु होणार मुहूर्त ट्रेडींग?
आज 2081 व्या संवत् प्रारंभानिमित्त होत असलेलं मुहूर्त ट्रेडींग सायंकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील व्यवहार होती. प्रो ओपनिंग सेशन्समध्ये 5.45 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. बाकी आजचा शेअर बाजाराचा दैनंदिन कारभार हा सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुरु राहील. शनिवारी आणि रविवारी शेअर बाजारातील कारभार बंद असणार आहे.
यांच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस
मुहूर्त ट्रेडिंग हे दिर्घकालीन गुंतवणूक करणारे फार महत्त्वाचं मानतात. आर्थिक वर्षाची सुरुवात या ट्रेडिंगच्या माध्यमातून करणारे अनेक मोठे ट्रेडर्स आहेत. गुंतवणुकीसाठी लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या काळात केलेल्या गुंतवणुकीचा अधिक फायदा होतो असं म्हटलं जातं.
असा असेल आजचा प्रतिसाद?
ऑक्टोबरमध्ये शेअर बाजारात मोठी पडझड झाली असली तरी उत्सवाचे दिवस असल्याने शेअर बाजारात तेजी राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. टॉप 30 बीएसई स्टॉक्सचा निर्देशांक 80 हजारांखाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा निर्देशांत 80 हजारांखाली राहिला आहे. महिन्याभरापूर्वी हा निर्देशांक 85 हजारांहून अधिकवर होता.
कोणत्या शेअर्सवर असेल नजर
मंगळवारी एमसीएक्सच्या मुख्य निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर प्रवीण राय विराजमान झाल्याने या शेअरची चर्चा असेल असं सांगितलं जात आहे. तसेच रिलायन्सवरही अनेकांची नजर असणार आहे. युरोपीयन युनिअनने वॉल्ट डिस्नेबरोबरचा रिलायन्स जिओबरोबरचाचा करार स्वीकरला असल्याने कंपनीचे शेअर उसळी घेतील असा अंदाज आहे. कंपनीने दिलेले बोनस शेअर सुद्धा आजपासून ट्रेडींगमध्ये दिसतील.
नारायण हृदयालया आणि टाटा इनव्हेसमेंट कॉर्परेशनने त्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या कमाईचे आकडे नुकतेच जारी केले आहे. याचाही शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यात आहे. सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये बोंनंदा इंजिनिअरिंग्सने केलेल्या कमाईमुळे त्यांच्या शेअर्सचाही परिणाम मार्केटवर होईल असा अंदाज आहे.