आताची सर्वात मोठी बातमी, मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव, दोघांना लागण
राज्यात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे
मुंबई : राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicrone) हळूहळू हात पसरतोय. आतापर्यंत राज्यात 8 रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. या नव्या विषाणूबाबत अनेकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
आता मुंबईतही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. मुंबईत (Mumbai) दोघांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनची (Omicron Cases in Maharashtra) लागण झालेल्या रुग्णांची संख्या दहा झाली आहे.
25 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) जोहान्सबर्ग (Johannesburg) इथून आलेल्या 37 तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्याबरोबरच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि 25 नोव्हेंबरला अमेरिकेहून आलेल्या त्याच्या 36 वर्षीय मैत्रिणिलाही ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचं प्रयोगशाळा अहवालातून समोर आलं आहे.
या दोन्ही रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दोघांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या 5 अतिजोखमीच्या आणि 315 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे.
राज्यात एकूण किती ओमायक्रॉन रुग्ण? (Omicron Maharashtra Cases)
मुंबईत नव्याने 2 रुग्ण आढळून आल्याने राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांचा एकूण आकडा हा 10 वर पोहचला आहे.
महाराष्ट्र - 10
डोंबिवली - 1
पुणे - 1
पिंपरी चिंचवड - 6
मुंबई - 2
मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे 2 रुग्ण आढळले, राज्यात एकूण 10 रुग्ण