मुंबई : राज्यात कोरोनाचे आणखी चार नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलीय. मुंबईत तीन तर नवी मुंबईत १ अशा चार रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईतल्या रुग्णांची आठ तर नवी मुंबईत आता दोन रुग्ण झाले आहेत. तर राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३७ वर गेलीय. राज्यातल्या १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले.


क्षमता वाढवणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


केईएममध्ये बुधवारपासून नवी मशिन आणि सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे तिथे देखील रुगण चाचणीची क्षमता वाढणार आहे. १५ ते २० दिवसांच्या आत नवी लॅब सुविधा, प्रशिक्षण पुरवण्यात येणार आहे. महिन्याभरात मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबाद इथे लॅब उभारण्यात येणार आहेत. सेव्हन हिल्समध्ये ४०० बेड्स तयार करण्यात आले आहेत. एमपीएससी परीक्षा ३० मार्चनंतर घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.


पंतप्रधानांची घोषणा 


सार्क देशांमध्ये यासंदर्भातीस १५०० प्रकरणे समोर आली आहेत. एकमेकांच्या सहाय्याने याच्याशी लढण्यास सोपे जाईल असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. कोरोनाशी लढण्यासाठी सार्क देशांतकडून निधी उभारला जाईल. या निधीमध्ये १ कोटी डॉलर इतका निधी भारतातर्फे दिला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. यातून उपकरणे खरेदी केली जातील असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.