दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : देशभरात कोरोनाने थैमान घातले असून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा थांबण्याचे नाव घेत नाही. कोरोना प्रकरणावर विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. ठाकरे सरकार कोरोना रुग्ण नियंत्रणात आणण्यास अपयशी ठरल्याचा ठपका विरोधक करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचे मुळ निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील मातोश्रीच्या गेटवरील ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३ पोलीसांपैकी ३ जण काल रात्री ड्युटी करून आज सकाळी घरी गेले आहेत. 
तर १ जण आज ड्युटीवर होता. त्याला युनिव्हर्सिटी कलिना येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी मातोश्रीच्या गेटवरील पोलीसांची कोरोना चाचणी करण्यात आले होते, त्याचे अहवाल आज प्राप्त झाले


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुक्काम हा मातोश्री या त्यांच्या मुळ निवासस्थानीच असतो. शासनाने दिलेल्या वर्षा बंगल्यावर ते शासकीय बैठका. चर्चांसाठी जात असतात. 


मातोश्री जवळील चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी देखील याप्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. तसेच शासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 



वर्षाच्या गेटवरील महिला पोलीस अधिकाऱ्यास देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढणे हा देखील चिंतेचा विषय मानला जात आहे.