मुंबईतील ५६ हजार इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नसल्याचं उघड
५६ हजार इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नसल्याच समोर आलंय.
मुंबई : मुंबईतल्या इमारतींच धक्कादायक वास्तव समोर आलंय. ५६ हजार इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नसल्याच समोर आलंय. पालिकेतील भ्रष्टाचार, बिल्डरांशी असलेलं साटलोट याला जबाबदार असल्याच सांगण्यात येतंय. याची दखल राज्य सरकारने घेण गरजेच आहे.
पुनरावृत्ती ?
परळमधील क्रिस्टल टॉवरला आग लागल्यानंतर मुंबईतील अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नसल्याचे समोर आले. २०१७ मध्ये रेरा कायदा लागू होण्याआधीची ही आकडेवारी आहे. काल क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर इमारतीला ओसी नसल्याचं पुढे आलं होतं. त्यानंतर आता २०१७ या वर्षात एकूण ५६ हजार इमारतींच वास्तव समोर आलंय. ही आकडेवारी २०१७ ची आहे त्यानंतर २०१८ मध्ये यासंख्येत वाढ झाली असणार हे निश्चित. हे जर वेळीच थांबल नाही तर क्रिस्टल टॉवरची पुनरावृत्ती होणं शक्य आहे.