मुंबई : दादर येथे रेल्वे स्थानकाबाहेर भाजी घेण्यावरुन आणि पैशावरुन वाद झाला. यावेळी भाजी विक्रेत्याने ग्राहकालाचा भोसकले. दादर येथे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. केवळ १० रुपयांवरून वाद झाला, अशी माहिती पुढे आली आहे. सोनीलाल असे या भाजी विक्रेत्याचे नाव असून तो फरार आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाज घेण्यावरुन भाजी विक्रेता आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. हा वाद टोकाला गेला. भाजी विक्रेत्याने थेट ग्राहकाला चाकूनने भोसकले. जखमी ग्राहकाला तातडीने केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच ग्राहकाचा मृत्यू झाला. मोहम्मद हनीफ असे मृताचे नाव आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  



भाजी घेण्यावरु वाद झाल्याचे समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. मात्र त्याआधी भाजीवाला पळून गेला. दरम्यान तिथे असलेल्या इतर भाजी विक्रेत्यांनी पोलिसांसोबत वाद घालण्यात सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादामुळे एका ग्राहकाला प्राण गमवावे लागल्याची चर्चा येथे सुरु होती.