`झिंग झिंग झिंगाट`च्या सेटला आग
आदेश बांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात
मुंबई : झी मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या झिंग झिंग झिंगाट या कार्यक्रमाच्या सेटला आग लागली आहे. चेंबूर येथे असणाऱ्या एस्सेल स्टुडिओत आग लागल्याचं वृत्त समोर येत आहे. कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू असतेवेळी ही आग लागल्याचं कळत आहे. आग लागली त्यावेळी आदेश बांदेकर आणि इतर कलाकारांसह सर्वांचीच पळापळ झाली.
आग लागल्याचं कारण अद्यापही समोर आलेलं नसलं तरीही शॉट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या वर्षभरात मुंबई आणि परुसकारत लागलेल्या आगीच्या घटना पाहता यामागे नेमकं कारण तरी काय आहे, हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करत आहे. फायर ऑ़डिट, आग लागल्यावर घ्यायची प्रामिक काळजी, शॉक सर्किट होऊ न देण्याचे उपाय आणि आग लागण्याची कारणं लक्षात घेत आता त्या दृष्टीने पावलं उचलण्याची गरज भासू लागली आहे. मुख्य म्हणजे गेल्या वर्षभरात झालेल्या अग्नितांडवामध्ये अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला, तर काही ठिकाणी मोठ्य़ा प्रमाणात वित्त हानी झाली. त्यामुळे या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज भासू लागली आहे.