मुंबई : गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या अपघातात सहा जण मृत्यूमुखी पडले असून 31 जण गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर मृतांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूड मंडळींनी झालेल्या अपघाताचा विरोध करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबाचे समर्थन केले. त्याचप्रमाणे अभिनेत्री हेमा मलिनीने सुध्दा आपल्या भावना व्यक्त केल्या. 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अचानक पूल कोसळला या अपघातात मृत पावलेल्या मुंबईकरांसाठी आणि जखमी जे रूग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते.' 


 



अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, 'मुंईत आचानक झालेल्या अपघाता मुळे मी फार दुखी: आहे. अपघातात मृत पावलेल्या आणि जखमींच्या कुटुंबांसोबत आहे. त्यांच्या या कठीण प्रसंगी देव त्यांना सामर्थ्य देवो.'