मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नाना पाटेकर आणि मनसे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पाटेकर हे व्हिजेटीआयच्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी बोलताना नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजून आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले जगण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. इतरांना त्रास होऊ नये हे मला मान्य आहे. तरीसुद्धा फेरिवाल्यांची काही चूक नाही. चूक तुमची आमची आहे. महापालिकेने इतकी वर्षे कारवाई का नाही केली. दोन वेळच्या भाकरीसाठी कोणी काम करत असेन. आणि ती जर त्याला मिळाली नाही. तर, ते लोक काय करतील. इतरांच्या हातातील भाकरी हिसकाऊन घेईल. त्यामुळे सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, असे नाना म्हणाले आहेत.


काय म्हणाले नाना? (पहा व्हिडिओ)