देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील टोल नाक्यावरील (Toll Booth) वसुली थांबवण्यात यावी असं आव्हान केलं असून आमचं सरकार आल्यावर टोल बंद करणार अशी मोठी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकारने MSRDC अंतर्गत असणारे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरचे (Wester and Eastern Highway) रस्ते मुंबई महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. मुंबई महापालिका या रस्त्यांची विशेष काळजी ( डागडुजी ) करत असताना, या रस्त्यांवरची टोल वसुली सामान्य नागरिकांकडून केली आहे. ही टोल वसुली त्वरित बंद करावी. आमचं सरकार आल्यावर टोल वसुली बंद करणार असं आश्वासन आदित्य ठाकरेंनी तमाम मुंबईकरांना दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोल नाक्यावरुन आदित्या ठाकरे यांनी राज्य सरकारला सवालही केले आहेत. राज्य सरकार टोल नाका आणि जाहिरातींच्या होर्डिंगचे पैसे मुंबई महानगरपालिकेला (BMC) का नाही देत आहे. ही सगळी वसुली राज्य सरकार MSRDC कडे कंत्राटदारांच्या हितासाठी करत आहे का? असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.


सर्वात जास्त कर मुंबईकर देत असतात. मुंबई गोवा महामार्ग आणि इतर रस्ते हे चंद्रा वरील खड्ड्यां सारखे झाले आहेत. घटना बाह्य मुख्यमंत्री याकडे का लक्ष देत नाही आहे. जर महानगर पालिका सगळ करत आहे. तर टोल नाका रद्द करण्यात यावा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.  MSRDC चं मुंबईच्या रस्त्यांवर काही काडीमात्र काम नाही. मग होर्डिंग चे पैसे आणि टोलचे पैसे हे महानगर पालिकाकडे यायला हवेत. हे सर्व पैसे राज्य सरकारला आणि MSRDC ला जात आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


ही टोल वसुली बंद करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार नाही आहोत.कारण आंदोलन केले तर टोल वर काम करणाऱ्यांना त्रास होईल. मी मुंबई महापालिकेला पत्र दिले आहे. पण हे सरकार वसुली सरकार आहे कंत्राटदाराच सरकार आहे .आमचे सरकार आले की आम्ही टोल बंद करू असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबई गोवा मुंबई नाशिक महामार्गाची अवस्था बिकट आहे. बेस्टचे देखील हाल सुरू आहेत, घटनाबाह्य मुख्यमंत्री याकडे लक्ष देत नाहीत, त्यांच्या फक्त दिल्लीत वाऱ्या सुरू आहेत असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 


या सरकारची डेडलाईन जवळ येत चालली आहे,  राज्यात आणि देशात आमचे सरकार बनणार असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे असं आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.