मुंबई : सोमवार म्हणजे २० एप्रिल पासून  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील फळ मार्केट होणार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. पण या   फळ मार्केट आवारात फक्त २५० गाड्यानं परवानगी दिली जाणार आहे. सामान्य ग्राहकांना फळ मार्केटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. फक्त घाऊक व्यापऱ्यांना फळ मार्केटमध्ये प्रवेश असणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सोशल डिस्टसिंगचे नियम मोडता कामा नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शहरातील सर्व भाजी मंडई बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र, आता ज्या ठिकाणी भाजी मंडई सध्या कार्यान्वित आहे. त्या ठिकाणच्या नजिकच्या मोकळ्या जागी भाजी मंडई सोशल डिस्टन्सिंगचा अंमल प्रभावीपणे करता येईल, अशा ठिकाणीच सुरु केली जाणार आहे. मात्र जागा निश्चित झाल्यानंतरच सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत भाजी विक्री सुरु केली जाईल. याबाबतचे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत.


कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे देशातील नागरिकांनी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेता १४ एप्रिल रोजी शिथिल होणाऱ्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. यंदाचा लॉकडाऊन १९ दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. आता हा लॉकडाऊन ३ मे पर्यंत असणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. वाढत्या अडचणींमुळे सोशल डिस्टसिंगचे सुद्धा बारा वाजले आहेत.