मुंबई : मुंबई विमानतळावरील विमानवाहतुकीत हा एक नवा रेकॉर्ड झाला आहे. 


विमानवाहतुकीत नवा रेकॉर्ड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवार-शनिवारपर्यंतच्या २४ तासांमध्ये एकाच धावपट्टीवर तब्बल ९६९ विमानांनी लँडिंग आणि टेकऑफ केलं. मुंबई विमानतळावरील विमानवाहतुकीत हा एक नवा रेकॉर्ड ठरलाय.


...म्हणून हे झालं शक्य


हवाई नियंत्रण कक्षातील नियंत्रकांचे काटेकोर नियोजन आणि विमानतळाच्या सर्व यंत्रणांचा समन्वय यामुळेच हे शक्य झालं असं हवाई नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.


विमानतळाची मर्यादा


एकावेळी एकच धावपट्टी वापरता येते, ही मुंबई विमानतळाची मोठी मर्यादा आहे. मात्र, त्यातच विस्तार आणि सुयोग्य नियोजनाची संधीही असते.



२००६पर्यंत मुंबई विमानतळावर तासाला ३० विमानांचं लँडींग आणि टेकऑफ व्हायचं. मुख्य धावपट्टी वेगाने मोकळी करण्यासाठी बांधलेले टॅक्सीवे, नवी रडार तसेच इतर सुलक्ष प्रक्रियांमुळे दोन वर्षांत ही संख्या तासाला कमाल ५२ विमानांची हाताळणी करण्यापर्यंत पोहोचली. यापूर्वी २४ तासांत कमाल ८५२ विमानांची हाताळणी झाली आहे.