Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती वाढत असतानाच सामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडलं आहे. अशातच आता वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई आणि उपनगरात सीएनजी (CNG) अडीच रुपयांनी स्वस्त झालाय. त्यामुळे आता खूप दिवसांनंतर मुंबईकरांना (Mumbai News) खुशखबर मिळाली आहे. (mumbai amid prices of cng fall substantially by 250 rupees per kg latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत 87 रुपये प्रती किलोने आता सीएनजी (CNG Rate) मिळणार आहे. एका बाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडलंय. सीएनजीचा दर कमी करण्यात आल्यानं त्यातून थोडाफार दिलासा मिळालाय. रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि सीएनजी वापरणारे खासगी वाहनचालक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


मुंबईकरांना आता 1 किलो सीएनजीसाठी 89.50 रुपये मोजावे लागत होते. त्यानंतर आता एक फेब्रुवारीपासून मुंबईतील नागरिकांना 87 रुपये मोजावे लागणार आहे. 1 फेब्रुवारीपासून हे दर लागू होणार आहे. सीएनजी अडीच रुपयांनी स्वस्त झाल्याने आता मोठा दिलासा मिळाल्याचं पहायला मिळतंय.


आणखी वाचा - BMC Budget 2023 : मुंबईकरांना दिलासा मिळणार का? गुरुवारी सादर होणार बीएमसीचे बजेट


दरम्यान, मुंबईत पेट्रोलचे दर देखील गगनाचा टेकले आहेत. मुंबईतील पेट्रोलचे दर हे 44 टक्क्यांनी कमी आहेत. त्यामुळे सीएनजीचा वापर इतर इंधनांपैक्षा जास्तीत जास्त करावा, असं आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाची हाणी देखील टाळली जावू शकेल.