मुंबई : मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेसवर अंधेरी जवळ सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला. जोगेश्वरीहून बांद्राला जाणारी मेट्रोची क्रेन अंधेरीच्या गुंदावली भागातल्या बस स्टॉपवर कोसळली. क्रेन चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका मोठा होता की क्रेनचे दोन तुकडे झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बस स्टॉपवर उभी असलेल्या महिलेच्या अंगावर ही क्रेन कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला...फाल्गुनी पटेल असं या महिलेचं नाव होतं. 



महिलेसह या बस स्टॉपवर असलेले आणखी दोघजण या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर क्रेन चालक फरार झाला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.