मुंबई : मुंबईतील आझाद मैदानाजवळ झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. तर चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी असलेल्या रुग्णावर जीटी रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत. घराकडे परतणाऱ्या तसेच खाद्यपदार्थाच्या स्टॉलजवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींवर ही फांदी पडली.


जोरदार पाऊस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवार संध्याकाळपासून मुंबई आणि  उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात दहिसर कांदिवली बोरिवली मालाड गोरेगाव जोगेश्वरी अंधेरी येथील सखल भागात पाणी जमा झाले आहे . हिंदमाता , सायन , अंधेरी सब वे , सायन , माटुंगा गांधी मार्केट सह मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलंय. 
दरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेवरही वेळापत्रकाचे तीन तेरा वाजल्याचं स्पष्ट आहे.


वसईतही पावसाचा जोर 


वसईत आज पहाटे पासून पावसाने चांगलाच ज़ोर धरला आहें.  त्यामुळे सकाळी कमावर जाणाऱ्या चाकरमान्याचे आणि शाळकरी मुलाचे हाल झाले आहेत.काल दिवसभर देखील पावसाचीं संतत धार सुरु होती.