म्हणून मुंबईच्या वांद्रे भागात सापडतायत सरपटणारे प्राणी
मुंबईतल्या वांद्रे इथे साप, अजगर आणि इतर सरपटणारे प्राणी आढळून येत आहेत.
मुंबई : मुंबईतल्या वांद्रे इथे साप, अजगर आणि इतर सरपटणारे प्राणी आढळून येत आहेत. मेट्रो ३च्या कामासाठी होत असलेलं खोदकाम आणि त्यामुळे जमिनीला बसणारे हादरे, हे यामागचं मुख्य कारण आहे.
खारफुटी हे सरपटणाऱ्या प्राण्यांचे सुरक्षित आश्रयस्थान मानलं जातं. मोठ्या प्रमाणात झालेली खारफुटींची तोड हे या घटनांसाठी कारणीभूत असल्याचं निसर्गप्रेमी सांगत आहेत. या भागात गेल्या आठवड्यात सर्पमित्रांनी चार अजगरांना पकडून वनविभागाकडे सोपवलं.