मुंबईच्या अंगणात मरण झालं स्वस्त, १५ दिवसांत ४५ बळी
मुंबई बनली मुं`बळी`
मुंबई : मुंबई आणखी किती बळं घेशील. असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे. गेल्या १५ दिवसांत मुंबईत ३० पेक्षा जास्त बळी निव्वळ गेले आहेत. स्वप्ननगरी, मायानगरी, आमची मुंबई, लाडकी मुंबई किती ही मुंबईची कोतुकं, पण या सगळ्यापासून वास्तव कोसो दूर आहे. कारण मुंबईतल्या गेल्या काही दिवसांतला बळींचा आकडा झोप उडवणारा आहे.
स्वप्ननगरी मुंबईत मृत्यूनं सापळे लावले आहेत का आता असाच प्रश्च उपस्थित होत आहे. कुणी घरात मेलं, कुणी गटारात पडून, कुणी खड्ड्यात पडून, कुणी नाल्यात, तर कुणी साखरझोपेत असताना भिंतीखाली दडपून. किड्या मुंग्यांसारखी हकनाक माणसं मेली.
१ जुलै- मालाडमध्ये भिंत पडली, ३० जणांचा मृत्यू
१० जुलै - गोरेगावमध्ये गटारात दिव्यांश पडला
१२ जुलै - वरळीमध्ये कोस्टल रोडच्या खड्ड्यात पडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
१५ जुलै - धारावीमध्ये नाल्यात पडून मुलाचा मृत्यू
रोज मरणाच्या गर्दीत ट्रेनमधून पडून किती मरतात, त्याची तर गणतीच नाही. मुंबई किती भारी होतीस तू. पण या भ्रष्ट यंत्रणांनी तुला बदनाम केलं. तुझ्या अंगणात मरण फारच स्वस्त झालं.