मुंबई, भुवनेश्वर, ढेंकनालच्या IIMC कनेक्शन्स २०१९मध्ये पियुष पांडे, जयजीत दास यांना इफको ईमका अवॉर्ड
आयआयएमसी अलुमनी असोसिएशनच्या महाराष्ट्र आणि उडीसा चॅप्टरचं वार्षिक मीट कनेक्शन्स २०१९ मुंबई भुवनेश्वर आणि ढेंकनालमध्ये संपन्न झालं.
मुंबई : आयआयएमसी अलुमनी असोसिएशनच्या महाराष्ट्र आणि उडीसा चॅप्टरचं वार्षिक मीट कनेक्शन्स २०१९ मुंबई भुवनेश्वर आणि ढेंकनालमध्ये संपन्न झालं. कनेक्शन्स २०१९ची सुरुवात १७ फेब्रुवारीला आयआयएमसी मुख्यालय दिल्लीहून झाली होती. याचा समारोप १३ एप्रिलला बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये होईल. या दरम्यान देश आणि परदेशातल्या २० शहरांमध्ये वेगवेगळ्या चॅप्टरच्या मीट आयोजीत करण्यात येतील.
मुंबई प्रेस क्लबमध्ये महाराष्ट्र चॅप्टरच्या मीट कनेक्शन्स २०१९ मुंबईमध्ये ईमका अध्यक्ष प्रसाद सान्याल यांनी पियुष पांडे यांना बिजनेस रिपोर्टिंगसाठी इफको ईमका अवॉर्डचं स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड मिळालं.
या मीटची अध्यक्षता चॅप्टरचे उपाध्यक्ष धनंजय रॉय यांनी केली, तर मंच संचालन महासचिव नीरज वाजपेयींनी केलं. या मीटला कोषाध्यक्ष संघटन सचिव रीतेश वर्मा, सचिव साधना आर्य यांच्याशिवाय आयपीएस अधिकारी विरेंद्र मिश्र, बँक अधिकारी रत्नेश कुमार, सतीश कुमार सिंग, वंदना कुमारी, शालिनी रावला, ब्रज किशोर यांनीही संबोधित केलं.
ईमकाचे अध्यक्ष प्रसाद सान्याल यांनी ईमका मेडिकल सहाय्यता कोष आणि ईमका स्कॉलरशीप या नव्या योजनांची माहिती दिली. चॅप्टरचे महासचिव नीरज वाजपेयी यांनी चॅप्टरच्या नियमित बैठका आणि अलुमनीच्या भागीदारीची गरज बोलून दाखवली.
ढेंकनालमध्ये आयआयएमसीच्या पूर्व भारत कॅम्पसमध्ये असोसिएशनच्या उडीसा चॅप्टरनं पहिली मीट कनेक्शन्स २०१९ ढेंकनालचं आयोजन केलं. यामध्ये कॅम्पसचे संचालक प्रो. मृणाल चटर्जी यांनी स्वप्निल जोगळेकरला बीबी मोहंती मेमोरियल अवॉर्ड, प्रियांका जोशी यांना केएम श्रीवास्तव मेमोरियल अवॉर्ड आणि भरत भूषण परीदा यांना चिंतामणी महापात्र मेमोरियल अवॉर्ड दिलं.
ढेंकनाल मीटचे अध्यक्ष ईमका उडीसा चॅप्टरचे अध्यक्ष संजय साहू यांनी केलं. याला ईमकाचे कार्यकारी अध्यक्ष रीतेश आनंद, उत्तर प्रदेश चॅप्टर संघटनेचे सचिव कमलेश राठोड यांच्याशिवाय संघटनेचे सचिव रितेश वर्मा, माजी कोषाध्यक्ष दीक्षा सक्सेना, केंद्रीय समिती सदस्य स्नेहा भट्टाचार्य यांनी संबोधित केलं.
ईमका उडीसा चॅप्टरनं दुसरी मीट कनेक्शन्स २०१९ भुवनेश्वरचं आयोजन भुवनेश्वरमध्ये केलं. इकडे वरिष्ठ पत्रकार संगीता अग्रवाल यांनी जयजीत दास यांना बिजनेस रिपोर्टिंगसाठी इफको ईमका अवॉर्डचं स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड दिलं. मीटला इफको ईमका अवॉर्डचे यावर्षीचे विजयी वरिष्ठ पत्रकार जजित करण, प्रबीर प्रधान, इतिश्री सिंह राठोड, रुद्र प्रसन्न रथ आणि अभिलाष पाणिग्रही यांनी संबोधित केलं.
भुवनेश्वर मीटची अध्यक्षता चॅप्टर अध्यक्ष संजय साहू यांनी केली. तर मीटचं संचलन कोषाध्यक्ष किशन बराई यांनी केलं. मीटमध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या इफको ईमका अवॉर्डच्या धरतीवर उडीसा चॅप्टरचं अवॉर्ड सुरू करण्याबद्दल चर्चा झाली. मीटमध्ये ईमकाच्या कार्यकारी अध्यक्ष रितेश आनंद यांच्यासोबत केंद्रीय समिती आणि युपी चॅप्टरचे प्रतिनिधीही सामिल झाले.