मुंबई : मुंबईतला लॉकडाऊन उठवण्याबाबत महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मुंबई अनलॉक होण्यासाठी तयार आहे, पण एमएमआर भागातला कोरोना नियंत्रणात येईपर्यंत मुंबई अनलॉक करण्यासाठी थांबावं लागेल, असं महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये २ महिन्यांपासून १७०० च्या वर रुग्णसंख्या गेली नाही. मुंबईचा रुग्णवाढीचा दर १ टक्का आहे, पण मुंबई लगतच्या शहरांमध्ये कोरोना वाढतोय. सध्या मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६४ दिवसांचा आहे. एमएमआरमध्ये जेव्हा हा कालावधी वाढेल, तेव्हा लोकल सुरू करता येतील, असं चहल यांनी स्पष्ट केलं आहे.


एमएमआर भागामध्ये असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, पनवेल, उल्हासनगर या भागांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईप्रमाणेच या भागांमधला कोरोना नियंत्रणात आल्यानंतर मुंबईच्या लोकल सुरू होतील, असे स्पष्ट संकेत मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी दिले आहेत.