बीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...
Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे.
Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन (BMC Covid Scam) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची चौकशी होणार आहे. त्यावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झाल्या आहे. बीएमसी कोविड घोटाळ्याची चौकशी करायची असेल तर राज्यातील इतर महापालिकांचीही चौकशी झाली पाहिजे, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
तरदुसरीकडे महापालिकेतील गैरव्यवहारांबाबत ईडी चौकशी करत आहे, ही चौकशी आम्ही लावली नाही, या चौकशीवरुन विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोर्चे काढले जात आहे. खरं तर हा मोर्चा मातोश्री 1 ते मातोश्री 2 दरम्यान काढायला हवा होता, कारण जो काही गैरव्यवहार झाला तो तिथून झाल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. (mumbai bmc covid center scam chief minister shinde attacked uddhav thackeray iqbal singh chahal pc today ias officer sanjeev jaiswal news )
IAS अधिकारी संजीव जयस्वाल अडचणीत वाढ
दरम्यान महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scam) IAS अधिकारी संजीव जयस्वाल (Sanjay Jaiswal) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोविड काळात संजीव यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर गुंतवणूक केल्याचं उघड झालं आहे. 2020 मध्ये संजीव यांनी पत्नीच्या नावावर 5 कोटी रुपये फिक्स्ह डिपॉझिटमध्ये गुंतवल्याचं चौकशी दरम्यान समोर आलं आहे. संजीव जयस्वाल यांची शुक्रवारी ईडी कार्यालयात जवळपास 10 तास चौकशी झाली.
इकबाल सिंह चहल यांची आज पत्रकार परिषद
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि सध्या प्रशासक असणारे इकबाल सिंह चहल हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबई महापालिका कोव्हिड घोटाळ्यावरुन होत असणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर चहल हे पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतंय.
दरम्यान, हा घोटाळा झाला तेव्हा यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्षपदी होते. मग त्यांना यशवंत जाधव चौकशीसाठी का बोलावलं जात नाही? ते शिंदे गटात असल्यामुळेच त्यांना अभय दिलं जात आहे काय? असे प्रश्न उपस्थित करण्यात येतं आहे.