Mumbai BMC Jobs : हातात पदवी आली की अनेकांचाच नोकरीसाठीचा शोध सुरू होते. काही मंडळींचा हा शोध हाती पदवी येण्याआधीच सुरू झालेला असतो. हल्ली नोकरीच्या शोधातही अनेक प्राधान्यक्रम पाहायला मिळतात. अगदी नोकरीच्या ठिकाणापासून नोकरीच्या ठिकाणी दिला जाणारा पगार, सुट्ट्या इथपासून कामाचं स्वरुप असा हा एकंदर प्राधान्यक्रम असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं एक सुवर्णसंधी देण्यात येत आहे. BMC मध्ये नोकरी मिळावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून, इथं येत्या काळात लिपिक अर्थात क्लर्क पदी 1846 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 


नोकरीसाठीच्या जागा किती?


अनुसूचित जाती- 142 
अनुसूचित जमाती- 150 
विमुक्त जाती-अ- 49 
भटक्या जमाती- ब- 54
भटक्या जमाती - क- 39
भटक्या जमाती - ड- 38
विशेष मागास प्रवर्ग- 46
इतर मागासवर्ग- 452
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक - 185
सामाजिक आणि शैक्षणिदृष्ट्या मागासवर्ग- 185
खुला प्रवर्ग- 506



हेसुद्धा वाचा : Police Bharti 2024 : पोलीस भरतीसंदर्भातील मोठी बातमी; भरतीसाठीचा नवा मुहूर्त समोर 


 


कधीपासून भरता येणार अर्ज? 


पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार 20 ऑगस्टपासून या पदासाठीची अर्जभरणा प्रक्रिया सुरू होणार असून, ऑनलाईन पद्धतीनं इच्छुकांनी हा अर्ज भरणं अपेक्षित आहे. 9 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत या पदासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर लिपिक पदासाठीच्या अर्ज भरणा प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तूर्तास लिपिक पदासाठीच्या भरतीवर पालिका प्रशासनानं लक्ष केंद्रीत केलेलं असतानाच तिथं पाणीपुरवठा भागावरही कामाचा ताण असल्यामुळं येत्या काळात या विभागातही नोकरीच्या संधी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान सदरील भरती प्रक्रियेची माहिती पालिका प्रशासनानं जाहिरातीत सविस्तर स्वरुपात प्रसिद्ध केली आहे.