मुंबईत प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधत धडक कारवाई
मुंबई पालिकेची रविवारी धडक कारवाई
मुंबई : राज्यात शनिवारपासून प्लास्टिक बंदी सुरू झालीय. आज रविवार असून सुद्धा सकाळपासून मुंबई महापालिकेनं प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधत धडक कारवाईला सुरूवात केली. चेंबुर एम विभागात मुंबईतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी पथकं तयार करून कारवाईला सुरूवात केली. पथकानं फेरीवाले आणि दुकानात जाऊन तपासणी केली. काही रेडीमेड गारमेंट दुकानात प्लास्टिक पिशव्या सापडल्या या दुकानदारांकडून अधिकाऱ्यांनी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. दुकानदारांनी आपली चुक कबूल करत यापुढे प्लास्टिक वापरणार नसल्याचं सांगितलं. ही कारवाई अशीच सुरू राहणार असून आपण प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं.
पाहा व्हिडिओ