भेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा ११ वर, २० जणांना वाचविले
भेंडीबाजार येथील पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झालेत. यात अग्निशम दलाच्या ४ जवानांचा समावेश आहे. तर २० जणांना वाचविण्यात यश आलेय.
मुंबई : भेंडीबाजार येथील पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झालेत. यात अग्निशम दलाच्या ४ जवानांचा समावेश आहे. तर २० जणांना वाचविण्यात यश आलेय.
कोसळलेल्या इमारत ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकले असून घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले आहे. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसेच स्थानिक लोकांकडूनही बचावकार्य केले जाते आहे. एनडीआरएफचे ४५ जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
दरम्यान, स्थानिकांनी मोठी गर्दी केल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. दरम्यान, इमारत दुर्घटनेसाठी ट्रस्ट , सरकार आणि महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे. सरकारने नैतिक जबाबदार स्वीकारली आहे यापुढे कोणतीही दया न दाखवता धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना जबरदस्तीने खाली करण्यास भाग पाडू, अशी प्रतिक्रिया या दुर्घटनेनंतर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलेय.