मुंबई: सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि मुसळधार पावसामुळे आगोदरच कासवगतीने सुरू असलेली मध्य रेल्वे वाहतूक पुरतीच ठप्प झाल्याचे वृत्त आहे. सिग्नल यंत्रणेतील दूर करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वे कर्मचारी प्रयत्नशिल आहेत. पण, पावसामुळे आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मध्यरेल्वेच्या वाहतूकीचे पुरते बारा वाजले आहेत.


लोकल वाहतूक संथगतीनं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुवांधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली, कळवा, ठाण्यात रुळावर पाणी आल्य़ानं लोकल वाहतूक संथगतीनं सुरू आहे. सायन, माटुंगा रेल्वे  मार्गावरील रुळावरांवर पाणी साचलं. पाणी हटवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.


सखल भागात पाणी


मुंबईत संततधार होत असल्याने आणि सकाळ पासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. माटुंगा किंग सर्कल ते दादर ,परेल, पारसी कॉलनी या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सुमारे २ तासापासून वाहने एकाच ठिकाणी अडकून पडली आहेत. त्यामुळे आतील प्रवासी सुद्धा हैराण झाले आहेत.