मुंबई : पावसाळ्यामध्ये नेहमीच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनवर परिणाम होतो. मुसळधार पावासमध्ये मुंबईची लोकल सेवा प्रभावित होते. पण आता रेल्वे यावर उपाय घेऊन आली आहे. मध्य रेल्वेनं अत्याधुनिक वॉटरप्रुफ लोकोमोटिव्ह इंजिन तयार केलं आहे. लवकरच याला ट्रॅकवर आणलं जाणार आहे. हे इंजिन 12 इंच पाण्यातही पळणार आहे. सध्या वापरण्यात येणारी इंजिनमुळे 4 इंच पाणी साठलं तरीही ट्रेन सेवा बंद होते. रेल्वे ट्रॅकवर 4 इंच पाणी साठलं तरी सध्याचं इंजिनाच्या खाली असलेली ट्रॅक्शन मोटर खराब होते. इंजिन फेल होतं आणि ट्रेन आहे त्याठिकाणीच उभी राहते. पण आता असं होणार नाही. या अत्याधुनिक लोकोमोटिव्ह इंजिनमुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साठलं असेल तरी ट्रेन आणि एक्स्प्रेस चालू शकतात.


कुर्ल्यात बनवलं इंजिन


मागच्या काही वर्षांपासून मुंबईत पडलेल्या पावसामुळे लोकल ट्रेन ठप्प होतात. त्यामुळे रेल्वेनं नवीन लोकोमोटिव्ह इंजिन बनवल्याची प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे पीआरओ सुनील उदासींनी सांगितलं. हे इंजिन पावसामध्ये जमा होणाऱ्या पाण्यातही ट्रेनला खेचायला मदत करतं. या इंजिनाला कुर्ल्याच्या कारशेडमध्ये तयार करण्यात आल्याचं उदासी म्हणाले.