मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी नव्याने जामिनासाठी अर्ज केलाय. त्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी एका कार्यक्रमात ते लवकरच बाहेर येतील अशी प्रतिक्रिया दिली होती. तर सुप्रीय सुळे यांनीही नुकतीच भुजबळ हे निर्दोष असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 


जामीन मिळण्याची शक्यता


मनी लॉड्रिंग अॅक्टमधील कलम ४५ मुळे भारतीय राज्यघटनेने नागरिकांना बहाल केलेल्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाचा संदर्भ देत भुजबळांनी अर्ज केल्याने त्यांना जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. याआधी छगन भुजबळांनी तब्येतीचे कारण देत जामिन मागितला होता. त्यानंतर आपल्याला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आलीये असा अर्ज करत त्यानंतर वैद्यकीय उपचाराकरता भुजबळांनी जामिनासाठी अर्ज केला होता. 


याआधीही केला होता अर्ज


आधी पीएमएलए न्यायालयाने आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळांचा जामिन अर्ज फेटाळला होता. आजारपणाचे कारण देत छगन भुजबळ ३५ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले होते. तर राष्ट्रपती निवडणुकीकरता मदत करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांना मतदानाची परवानगी दिली होती.