Mumbai Water Cut News : फेब्रुवारीत प्रचंड तीव्रतेनं जाणवलेल्या उष्णतेच्या झळा आता मार्चमध्येही बसताना दिसत आहेत. अवकाळी पावसामुळं अनेक भागांमध्ये कमाल तापमानात काही अंशी घट झाली असली तरीही येता उन्हाळा किती भीषण असेल याची चिन्हं आतापासूनच दिसू लागली आहेत. कारण, मे उजाडणं दूरच इथं मार्चच्या सुरुवातीलाच मुंबईतील पाणीकपातीची सुरुवात झाली आहे. थोडक्यात ही बातमी मुंबईकरांच्या जीवाला घोर लावणारी (weather update). 


9 ते 11 मार्च पाणीपुरवठा बंद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये गुरुवार दिनांक 9 मार्च 2023 पासून पुढील दोन दिवस म्हणजेच 11 मार्च 2023 पर्यंत दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. 


दरम्यान, उन्हाळा सुरु झालेला असतानाच ठाणे येथील कोपरी पुलाजवळ ठाणे महापलिकेच्या वतीनं सुरु असणाऱ्या पुलाच्या कामादरम्यान (BMC) मुंबई महापालिकेच्या 2345 मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई 2’ जलवाहिनीचं नुकसान झालं आणि त्यातून पाणी गळतीस सुरुवात झाली. याच ठिकाणी आता दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे, त्यामुळं मोठं संकट ओढावण्याआधीच हे काम पूर्ण केलं जाण्याचा पालिकेचा मानस असेल.


गुरुवारी सकाळी 10 वाजता या कामास सुरुवात होईल. 11 तारखेला म्हणजेच शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. परिणामी 9 मार्चला सकाळी 10 वाजल्यापासून 11 मार्च सकाळी 11 वजेपर्यंत ही पाणीकपात लागू असेल. 


कोणकोणत्या भागात असेल पाणीकपात? 


मुंबई शहर- वडाळा, नायगाव, परळ, लालबाग, माजगाव, भायखळा, मस्जिद बंदर, डोंगरी, बीपीटी आणि नेव्ही नगर 


पूर्व उपनगर- घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग, कुर्ला (पूर्व) विभाग, देवनार, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, मुलूंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग, भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग, विक्रोळी (पूर्व)


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather: पुढचे तीन तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता


 


मुंबई आणि काही उपनगरीय भागांमध्ये लागू असणाऱ्या या पाणीकपातीमुळं सदनिकांमध्ये होणारा पाणीपुरवठा प्रभावित होऊ शकतो. ज्यामुळं नागरिकांनी परिस्थितीच्या अनुषंगानं पूर्वतयारी करत पाण्याचा विचारपूर्वरक वापर करावा.